चिंचोलीत शेतविहिरीत पाय घसरून पडल्याने 49 वर्षीय इसमाचा मृत्यू


49-year-old Isma dies after slipping and falling into a farm well in Chincholi यावल (16 जून 2025) : यावल तालुक्यातील चिंचोली येथे शेत शिवारामध्ये एका 49 वर्षीय इसमाचा शेत विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

चिंचोली गावातील रहिवासी सुरेंद्र रामलाल बाविस्कर (49) हा गावालगत असलेल्या शेतात गेल्यानंतर शेत विहिरीत त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीच्या पाण्यात बुडाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून काढून ग्रामीण रुग्णालयात आणले. असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !