भुसावळात तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी
Youth in Bhusawal threatened to kill him for not paying for alcohol भुसावळ (17 जून 2025) : शहरातील तिरुपती पेट्रोलपंप परिसरात एका तरुणाला दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
असे आहे प्रकरण
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी सकाळी 10.40 वाजता तिरुपती पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. तुषार दीपक ठाकूर (20, रा.दीनदयाळ नगर, भुसावळ) या तरुणाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्याच्याच परिसरातील नईम शेख याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने नईम शेख याने तुषार ठाकूर याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत 15 जून रोजी रात्री 9.43 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीसनिरीक्षक राहूल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.

