अहमदाबाद विमान अपघाताबाबत समोर आली ‘धक्कादायक’ माहिती

‘Shocking’ information emerges about Ahmedabad plane crash अहमदाबाद (18 जून 2025) : अहमदाबाद विमान अपघातात विमाातील 241 प्रवाशांसह एकूण 275 प्रवाशांचा मृत्यू ओढवला होता. 12 वर्षे जुन्या या बोईंग ड्रीमलायनर 787-8 विमानाची काही दिवसांपूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती तसेच मार्च 2025 मध्ये या विमानाचे इंजिन बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्सनुसार, एअर इंडियाच्या या विमानाची संपूर्ण तपासणी जून 2023 मध्ये करण्यात आली होती, तर पुढील तपासणी या वर्षीच्या डिसेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते. मात्र, त्यापूर्वीच विमानाचा सर्वात भीषण अपघात झाला. तसेच, एप्रिल 2025 मध्ये एअर इंडियाने या विमानाचे विमा संरक्षण 750 कोटी रुपयांवरून 850 कोटी रुपये केल्याची माहितीही समोर आली आहे.

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले की, त्या अपघातानंतर डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एअर इंडियाने सर्व विमानांची सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. कंपनीकडे असलेल्या बोईंग 787 विमानांच्या ताफ्यावर ही तपासणी केली जाईल. तपासणीनंतरच त्यांना पुढील ऑपरेशनसाठी मान्यता दिली जाईल. एअर इंडियाने बोईंग 787 विमानांपैकी नऊ विमानांवर अशा तपासणी पूर्ण केली आहे, तर उर्वरित 24 विमानांसाठी डीजीसीएने दिलेल्या वेळेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल. तसेच, या तपासणीमुळे काही उड्डाणांसाठी वेळ वाढू शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.
एअर इंडियाने जाहीर केली नुकसान भरपाई
एअर इंडियाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची अंतरिम भरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या एक कोटी रुपयांच्या भरपाईपेक्षा वेगळी आहे.
दरम्यान, अपघातात 241 प्रवाशांसह सुमारे 275 लोकांचा मृत्यू झाला. या अपघातात भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक रमेश विश्वास कुमार हे एकमेव बचावले.
