शिरसाड येथे घरासमोर कचरा व घाण टाकण्यावरून वाद : दोघांना मारहाण


Dispute over dumping of garbage and dirt in front of house in Shirsad : Two beaten up यावल (19 जून 2025) : यावल तालुक्यातील शिरसाड या गावात घरासमोर कचरा आणि घाण फेकल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून दोघांना दोघांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. काठीने डोक्यावर मारून दुखापत केली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
शिरसाड गावात घरासमोर कचरा व घाण फेकल्याच्या कारणावरून वाद झाला. आणि या वादातून रस्तूल सलीम तडवी (35) या महिलेला आणि आसीफ छोटू तडवी याला अशा दोघांना अलाउद्दीन अमीर तडवी आणि नथू अलाउद्दीन तडवी या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. आणि डोक्यावर काठीने मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहील गणेश करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !