तीन कोटींचे चार किलो सोने परत देता मेहुण्याला गंडा : नंदुरबारच्या शालकाविरोधात गुन्हा

A scammer returns four kilos of gold worth three crores to his sister-in-law: A case has been registered against a schoolboy from Nandurbar. जळगाव (19 जून 2025) : नंदुरबार येथील शालकाने व्यवसायासाठी सहा वर्षात तब्बल तीन कोटी रुपयांचे चार किलो सोने घेतले मात्र परत न देता मेहुण्याची फसवणूक केली. याप्रकरणी सराफा व्यापार्याने दिलेल्या तक्रारीअंती नंदुरबारच्या शालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमित दिलीप सोनार (45, रा. सिंधी कॉलनी, नंदुरबार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
विश्वास संपादन करून सोन्याची अफरातफर
सुवर्ण व्यावसायिक सुनील दिनानाथ सराफ (55, रा.श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ) यांचे जळगावातील सराफ बाजार परिसरात दुकान आहे. त्यांचा शालक अमित सोनार याने त्यांचा विश्वास संपादन केला. नंदुरबार येथील आपल्या दुकानावर दागिने बनवण्यासाठी त्याने सुनील सराफ यांच्याकडून थोडे-थोडे सोने घेतले. 2008 ते 2014 या सहा वर्षांच्या कालावधीत, अमितने 60 ग्रॅम ते 250 ग्रॅम या प्रमाणात असे एकूण चार किलो सोने घेतले. या सोन्यातून त्याने दागिने बनवून ते स्वतःच्या व्यवसायासाठी वापरले. मात्र, सराफ यांना पैसे किंवा सोने परत देण्याबाबत टाळाटाळ करत त्याने ते स्वतःच्या फायद्यासाठी वापरले.
अखेर पोलिसांत तक्रार दाखल
तब्बल तीन कोटी रुपयांचे सोने घेऊनही ते परत मिळत नसल्याने, सुनील सराफ यांनी अखेर शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अमित सोनारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.. विशेष म्हणजे एवढी वर्षे होऊनही सोने परत मिळत नसल्याने सराफ हे वारंवार सोने मागण्यासाठी गेले असता, त्यांना शिवीगाळ करण्यासह दमदाटीही करण्यात यायची, असे सराफ यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.
