भुसावळातील के. नारखेडे विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात

World Yoga Day celebrated with enthusiasm at K. Narkhede Vidyalaya in Bhusawal भुसावळ (21 जून 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, क्रीडा शिक्षक निलेश नेहेते, नवीन नेमाडे आदींनी विद्यार्थ्यांसह विविध योगासनांचे सादरीकरण केले. वज्रासन, ताडासन, वृक्षासन, प्राणायाम व शवासन इत्यादी योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. एस.एम.चिपळूणकर यांनी भारताची प्राचीन परंपरा असलेल्या योगाचे महत्व आणि वारसा आणि या दिनाचे भौगोलिक वैशिष्ट्य या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण, असे विचार व्यक्त केले.
विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना याप्रसंगी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील सकाळ व दुपार शाखेतील व संगणक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
