वेल्हाळेतील वयोवृद्धाचा रोटावेटर मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू


Elderly man from Velhale dies after getting stuck in rotavator machine वरणगाव (21 जून 2025) : रोटावेटर मशीनमध्ये अडकून शेतकर्‍याला जागीच प्राण गमवावे लागले. भुसावळच्या विल्हाळे शेत शिवारात ही अंगारचा थरकाप उडवणारी घटना घडली.

कचरू उघडू सुरवाडे (70, रा.विल्हाळे) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. ते शेतात मशागतीचे काम करीत होते. या कामासाठी त्यांनी ट्रॅक्टरला रोटर मशीन जोडून काम सुरू केले मात्र मशागत करत असताना अचानक ट्रॅक्टरवरील तोल गेला. ते खाली पडले व थेट रोटरमध्ये अडकले. ही दुर्दैवी घटना बुधवार, 18 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.


अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वरणगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत सुरवाडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !