मोहराळ्यातील तरुणाचा खून शेतीच्या वादातून : यावलच्या निलंबित पोलिस कर्मचार्‍यासह तिघांविरोधात गुन्हा


Murder of a youth in Moharala over a farming dispute: Case filed against three including a suspended police officer from Yaval यावल (23 जून 2025) : यावल तालुक्यातील मोहराळा या गावातून बेपत्ता व नंतर पाच दिवसानंतर विहिरीत मृतदेह आढळलेल्या 19 वर्षीय तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या तरुणास गावातीलच त्याच्या सख्या आत्याचे पती तथा निलंबित पोलिस कर्मचारी यांच्या सांगण्यावरून दोन अल्पवयीन मुलांनी अंमली पदार्थ गांजाचे सेवन करून विहिरीत ढकलण्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी यावल पोलिसात रविवारी दोन अल्पवयीनांसह एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण
मोहराळा, ता.यावल या गावातील रहिवासी साहिल शब्बीर तडवी (19) हा तरुण 16 जूनपासून बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊन ही तो मिळून आल्याने यावल पोलिसात हरवण्याची तक्रार नोंदवण्यात आली. या दरम्यान शुक्रवार, 20 जून रोजी त्याचा मृतदेह मोहराळा गावाकडून वड्री गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील रेवा मधुकर चौधरी यांच्या शेत विहिरीत आढळला. मृतदेह विहिरीत मिळाल्यानंतर मयताचे कुटुंब व नातलगांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत गावातील निलंबित पोलिस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या घरावर हल्ला चढवला होता व त्यांच्या वाहनाची तोडफोड केली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह गावात दाखल झाले होते व त्यांनी गावात शांतता प्रस्थापीत करून चोख बंदोबस्त लावला होता. मृतदेह तेथून काढून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला होता.

अल्पवयीनांनी दिली खुनाची कबुली
या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गावातील दोन 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी बोलावले आणि त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आपण निलंबित पोलिस कर्मचारी अय्युब हसन तडवी यांच्या सांगण्यावरून साहिल तडवी याला अंमली पदार्थ गांजा सेवन करताच त्याला विहिरीत ढकलून दिले व त्याचा मोबाईल एका विहिरीत टाकला. घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर यावल पोलिसात समीर गफुर तडवी यांच्या फिर्यादीवरून निलंबित पोलिस कर्मचारी अयुब तडवी व दोन अल्पवयीनांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !