कासवे येथे मागील भांडणाच्या कारणावरून तरुणाला चौघांची मारहाण


A youth was beaten up by four people in Kasawe over a previous fight यावल (23 जून 2025) : यावल तालुक्यातील कासवे या गावात खळवाडी भागात मागील भांडणाच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका 33 वर्षीय तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. काठीने आणि विळ्याने त्याला मारून दुखापत केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चार जणांविरोधात गुन्हा
कासवे गावात खळवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी मागील भांडणाच्या कारणावरून महेंद्र विलास सपकाळे (33) या तरुणाला संजय नथ्थु सपकाळे, संतोष नथ्थू सपकाळे, लताबाई नथ्थू सपकाळे व प्रतिभा संजय सपकाळे या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. काठीने आणि विळ्याने मारून त्याला दुखापत केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष चौधरी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !