किनगाव खुर्द येथून आईसोबत आलेल्या अल्पवयीन मुलीस पळवले


A minor girl who came with her mother from Kingaon Khurd was abducted यावल (23 जून 2025) :  यावल तालुक्यातील किनगाव खुर्द गावातील रहिवासी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत यावलच्या शुक्रवारच्या बाजारात आली होती. शहरातील नसीब किराणा दुकानासमोरून तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
किनगाव खुर्द येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईसह भाजीपाला विक्रीकरीता यावलच्या शुक्रवारच्या बाजारात आली असता बाजारात असताना नसीब किराणा दुकानासमोरून या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !