पाच हजारांची लाच भोवली : मांडकी ग्रामसेवकासह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात
नंदुरबार एसीबीच्या कारवाईने खळबळ : लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ

Five thousand rupees bribe : Mandaki village worker and employment worker in ACB’s net भडगाव (24 जून 2025) : घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यासह गट नंबर नमुना आठ देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना भडगाव तालुक्यातील मांडकी गावातील ग्रामसेवकासह रोजगार सेवकाला नंदुरबार एसीबीने अटक केली. सोमवार, 24 जून रोजी सायंकाळी उशिराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सोनीराम धनराज शिरसाठ (47, पाचोरा, जि.ळगाव) असे अटकेतील ग्रामसेवकाचे तर जितेंद्र लक्ष्मण चौधरी (38, पाचोरा) असे रोजगार सेवकाचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
मांडकी गावातील 35 वर्षीय तक्रारदाराच्या मंजूर असलेल्या घरकुलाच्या दुसरा हप्ता मिळावा व गट नंबर नमुना आठ मिळण्यासाठी सहा हजारांची मागणी आरोपींनी 23 रोजी केल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. आरोपींनी पाच हजारांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींचा मोबाईल जप्त करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी नंदुरबार एसीबीचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विलास पाटील, पोलिस नाईक हेमंत पाटील, पोलिस नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने केली. तपास जळगाव पोलिस निरीक्षक नेत्रा जाधव करीत आहेत.