पत्नी माहेरी, पतीची मोबाईलमध्ये चित्रीकरण सुरू ठेवत आत्महत्या !


Wife commits suicide while filming husband on mobile phone! जळगाव (24 जून 2025) : पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना तरुणाने मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार, 21 जून रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रमोद धनराज सोनवणे (37, रा.कुसुंबा, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे. त

काय आहे नेमके प्रकरण
सोनवणे हे रंगकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी आठ वर्षीय मुलीसह आसोदा येथे माहेरी गेली असताना ते घरी एकटेच असलेल्या सोनवणे यांनी घराच्या समोरील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि चावी शेजारच्यांकडे दिली. त्यानंतर, त्यांनी मागील दरवाजाने घरात जाऊन आतून कडी लावली व गळफास घेतला.

पत्नी परतल्यानंतर तिने शेजारच्यांकडून चावी घेत दरवाजा उघडला असता, पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.(केसीएन)प्रमोद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रमोद सोनवणे यांनी गळफास घेण्यापूर्वी समोर स्वतःचा मोबाइल ठेवून त्यात चित्रीकरण सुरू केले. दोरी गळ्यात अडकविण्यापासून ते गळफास घेऊन लोंबकळण्यापर्यंत सर्वकाही चित्रीत झाले आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !