सीबीआयच्या नावाने धमकावत चाळीसगाव तालुक्यातील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याला 31 लाखांचा गंडा


Retired medical officer in Chalisgaon taluka duped of Rs 31 lakh by threatening him with CBI जळगाव (26 जून 2025) : चाळीसगाव तालुक्यातील एका 73 वर्षीय सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याची तब्बल 31 लाख 50 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. संशयीतांनी दिल्लीतील सीबीआय पोलिस असल्याचे भासवून ही फसवणूक केली.

असे आहे फसवणूक प्रकरण
चाळीसगाव तालुक्यातील हे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी यांच्याशी 16 जून ते 23 जून 2025 या कालावधीत ‘सुनील कुमार’ नावाच्या व्यक्तीने संपर्क साधला. आपण दिल्ली सीबीआय पोलिस स्टेशनमधून बोलत असल्याचे सांगून, त्या व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकार्‍याचे बँक खाते मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरले जात असल्याची बतावणी केली. मोठ्या कौशल्याने त्याने वृद्ध अधिकार्‍याचा विश्वास संपादन केला.









यानंतर, विविध कारणांसाठी त्याने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने तब्बल 31 लाख 50 हजार रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, या सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍यांनी तात्काळ जळगाव सायबर पोलिसात धाव घेतली आणि फिर्याद दिली. त्यानुसार, मंगळवारी रात्री 8 वाजता ‘सुनील कुमार’ नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !