धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार निक्की पंजाबी स्थानबद्ध


Notorious criminal Nikki Punjabi from Dhule arrested धुळे (26 जून 2025) :  चोरी, जबरी चोरी, घरफोडी यासह विविध गुन्ह्यात कुख्यात असलेल्या रुतिक उर्फ निक्की अमरिकसिंग पंजाबी (25, कोळवले नगर, धुळे) यास नाशिक सेंट्रल जेलमध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे. धुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानंतर झालेल्या या कारवाईने जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळात अशाच पद्धत्तीने उपद्रवींवर कठोर कारवाया केल्या जाणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.

दहा गंभीर स्वरुपाचे गुन्हे
पंजाबीविरोधात मोहाडी पोलिसात चार, देवपूर पोलिसात दोन, आझादनगर एक व धुळे शहर पोलिसात तीन गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. जबरी चोरी, चोरी, घरफोडी तसेच अल्पवयीनांना सोबत घेवून गुन्हेगारी कृत्य अशा पद्धत्तीच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.









जिल्हाधिकार्‍यांकडून प्रस्तावाला मंजुरी
धुळे शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी संशयीताला स्थानबद्ध करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केल्यानंतर तो पोलिस उपअधीक्षकांमार्फत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे सादर केला व गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रस्तावाची छाननी करीत कायदेशीर तरतुदींची पडताळणी केल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला व त्यास 24 जून रोजी त्यास मंजुरी देत पंजाबी यास नाशिक सेंट्रल जेलमध्ये एक वर्ष स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

यांनी केली आदेशाची अंमलबाजवणी
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, गुन्हे शाखेचे अंमलदार संतोष हिरे, कबीर शेख, सतीश कोठावदे, विशाल सूर्यवंशी, गौरव देवरे, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने संशयीताला नाशिक सेंट्रल जेलमध्ये हलवले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !