भुसावळातील समता नगर रेल्वे कॉलनीत भरदिवसा घरफोडीने घबराट
महिलेच्या घरातून 66 हजारांचा ऐवज लंपास : गस्त वाढवण्याची अपेक्षा
Panic after broad daylight burglary in Samata Nagar Railway Colony, Bhusawal भुसावळ (28 जून 2025) : शहरातील समता नगर रेल्वे कॉलनीत भरदिवसा घरफोडी झाल्याने रहिवासी धास्तावले आहेत. आनंद बौद्ध विहाराजवळील एका महिलेच्या घरातनू चोरट्याने तब्बल 66 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी दुपारी 1.15 ते 1.40 या 25 मिनिटांच्या अवधीत घडली.
घरफोडीने उडाली खळब्ळ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशाकुमारी मनजितकुमार (31,) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांनी नमूद केले की, अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप उघडून घरात प्रवेश केला आणि संमतीशिवाय मौल्यवान दागिने व मोबाईल चोरीला नेले.
या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास सहाय्यक पोललि निरीक्षक युनूस शेख करीत आहेत.

या ऐवजावर मारला डल्ला
व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल, चांदीच्या चार साखळ्या (200 ग्रॅम वजनाच्या व 10 हजार रुपये किंतमीच्या पाच हजार रुपये किंमतीचे दोन ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्रद्व2 ग्रॅम, 5 हजार रुपये, पाच ग्रॅम वजनाच्या व 12 हजार 500 रुपये किंमतीच्या अंगठ्या, 300 रुपये किंमतीची सोन्याची नथ, 300 ग्रॅम वजनाचा 12 हजार रुपये किंमतीचा चांदीचा कंबरबंद, 15 हजार रुपये किंमतीची व सहा ग्रॅमची लहान मुलांची सोन्याची पाच पदके, पाचशे रुपये किंमतीचे चांदीचे बालकडे, देवाचे पाच चांदीचे शिक्के असा एकूण 66 हजार 800 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला.
