नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : 13 लाखांच्या गांजासह चौकडी जाळ्यात


Nandurbar Local Crime Branch’s major operation: Four arrested with ganja worth Rs 13 lakh नंदुरबार (22 जून 2025) : नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे 13 लाखांचा गांजा विक्रीला आणणार्‍या चौकडीला अटक केली आहे.

शहादा पोलिस ठाणे हद्दीतील असलोद ते मलगाव दरम्यान एक इसम स्वतःचे आर्थिक फायदयसाठी बेकायदेशीररित्या मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा गुंगीकारक सुका गांजा विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूकक करणार माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास सोबत शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांना याबाबत माहिती कळवून कारवाई करण्याचे कळवले.









चौकडी जाळ्यात
असलोद ते मलगाव दरम्यान दुधखेडा गावापुढे मलगाव मानमोड्या गावाकडून तीन मोटारसायकली येतांना दिसल्यानंतर त्यांना अडवण्यात अआल्यानंतर संशयीतांनी आपले नाव गुजार्‍या मंसाराम पावरा (20, रा.सटीपाणी जामजिरा, ता.शिरपूर), शिवदास विरसिंग पावरा (35, रा.गदडदेव, ता.शिरपूर), गणेश विरसिंग पावरा (21, रा.गदडदेव, ता.शिरपूर), नंदीलाल रोहिदास पावरा (19, आंबाफाटा ता.शिरपूर) सांगितले. संशयीताच्या ाहनावरील पांढर्‍या गोण्यांची तपासणी केल्यानंतर त्यात 53 किलो 330 ग्रॅम वजनाचा सुका गांजा (अंमली पदार्थ) व 03 वाहने असा एकूण 12 लाख 66 हजार 780 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्तक करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहादा पोलिस निरीक्षक निलेश देसले, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मुकेश पवार, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण, मुकेश तावडे, विशाल नागरे, बापू बागुल, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, अभय राजपुत, भरत उगले आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !