रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार्यांना करात 50 टक्के सूट द्या : शिशिर जावळे
भुसावळ पालिकेने जलस्तर वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Shishir Javale भुसावळ (29 जून 2025) : भुसावळ शहरात सातत्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न केल्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. उन्हाळा असो वा हिवाळा पावसाळा कुठला ही ऋतू असू देत आजपावेतो भुसावळकरांची तहान कोणीच शमवलेली नाही. या अनुषंगाने भुसावळ पालिकेने वॉटर हार्वेस्टिंग करणार्यांना करात 50 टक्के सूट द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी केली आहे.
तापमानाचा पारा वाढला
एकीकडे भुसावळ शहराच्या बाजूलाच असलेले दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र 660 मेगावॅट आणि आता या केंद्रात 800 मेगावॅटच्या वर चा प्रकल्प मंजूर झालेला आहे त्यामुळे आधीच उन्हाळ्यामध्ये भुसावळ तापमान 50 अंशापर्यंत पोहोचतं प्रचंड उकाडा उष्णता येथे असते. त्यात अजून या नवीन प्रकल्पाची भर पडणार असल्यामुळे नक्कीच तापमानात प्रचंड वाढ होईल. त्यामुळे नदी धरण याच्यातील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असते.

शहरातील मुख्य जलवाहिन्यांना 50 ते 55 वर्षे जुने असल्याकारणाने वारंवार जलवाहिन्यांना कायमस्वरूपी गळतीचे प्रकार सातत्याने होत आहेत. बर्याचदा वाटर सप्लाय विभागातील पंपिंग मशीन, मोटारी मध्ये अनेकदा तांत्रिक बिघाड होतो. तसेच कायमस्वरूपी भुसावळकरांना पिण्यासाठी अशुद्ध पाणीपुरवठा होत आलेला आहे. भुसावळ पालिकेने आज पावतो पिण्याच्या पाण्याचा शुद्धीकरणासाठी मोटारीच्या देखभाल दुरुस्तीकडे सुद्धा लक्ष दिलेले नाही किंवा त्यावर उपाययोजना सुद्धा केलेली नाही. भुसावळ पालिका प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्थेचे सुद्धा नियोजन शून्यअसून आज पावतो भुसावळ पालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी एक विशेष असं नियोजन किंवा उपक्रम यशस्वीपणे राबवल्या नसल्याकारणाने नागरिकांना सातत्याने पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच 2017 सालची अमृत योजने चे काम संथगतीने सुरू असल्यामुळे ही योजना किमान दोन ते अडीच वर्षे अजून पूर्ण होणार नसत्याचे दिसत आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये भुसावळ पालिकेकडून तापी नदीवर बांधण्यात येणारे बंधारे वाहून जातात परिणामी तिथे पाणी साठत नाही.
वॉटर हार्वेस्टिंग नियम लागू करावा
भुसावळ पालिकेचे स्वतःचे सुसज्ज असे शहरातील विविध ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंग सेंटर , छोटी जल तळे सुद्धा उभारण्यात आलेले नाहीये किंबहुना त्यावर उपाययोजना सुद्धा अद्याप पावतो पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. विविध बांधकाम परवानगी देताना वॉटर हार्वेस्टिंग नियम लागू झाला पाहिजे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी उपालिकेची स्वतःची योजना नसल्याने तसेच , नागरिकांकडे वॉटर हार्वेस्टिंग नसल्यामुळे तसेच , या आणि विविध कारणांमुळे शहरातील जलस्तर दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे.आणि म्हणून याचे गांभीर्य लक्षात घेऊन भुसावळ नगरपालिकेने पिण्याच्या संभाव्य पाणीटंचाई निर्मूलनासाठी भुसावळच्या भविष्याचा विचार करून आणि पिण्याच्या पाण्याचा शहरातील जलस्तर वाढवण्यासाठी पाणी सिंचनासाठी मोकळे भूखंड जमिनी सुद्धा भुसावळ पालिकेने उपलब्ध करून दिले पाहिजेत. तसेच तात्काळ नागरिकांसाठी वॉटर हार्वेस्टिंग योजना अमलात आणली पाहिजे ही योजना ची अंमलबजावणी करताना जे नागरिक आपल्या घरी परिसरात प्रतिष्ठान मध्ये वॉटर हार्वेस्टिंग करतील अशा नागरिकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याची योजना आखली पाहिजे. जेणेकरून या योजनेचा नागरिक मोठ्या प्रमाणात फायदा घेतील आणि वॉटर हार्वेस्टिंग करतील . त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचा जलस्तरसुद्धा वाढण्यास मदत होईल. त्यामुळे सदर योजना तातडीने भुसावळ शहरात राबविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर जावळे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचे सह भुसावळ नगरपालिका मुख्य अधिकार्यांना पत्र पाठविलेले असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे कळविलेले आहे.
