भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये वृक्षारोपण उत्साहात


Tree plantation in full swing at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (3 जुलै 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुवारी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेतील परिसरात आवळा, लिंब, नारळ, आंबा, पेरू, डाळींब, वड, पिंपळ, जास्वंद, मोगरा, जांभुळ आदी प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी घरी व त्यांच्या घरा परिसरातील भागात एक व्यक्ती एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला शिवाय हे वृक्ष जगवण्याची जबाबदारी देखील घेतली. शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी वृक्ष लावल्याने होणारे फायदे यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगिले की, आपल्याला प्रदूषण कमी करायचे असेल तर जास्तीत-जास्त झाडे लावून ती जगवणे गरजेचे आहे. झाडे ही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्वाची आहेत त्यांच्यामुळे आपल्याला शुद्ध हवा, पाणी आणि अन्न मिळते. झाडे नैसर्गिक आपत्तींपासून आपले संरक्षण करतात.
झाडे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्याचे त्या म्हणाल्या.














मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !