भुसावळात इनरव्हील रेलसिटीने साजरा केला वृक्षांचा वाढदिवस


भुसावळ (3 जुलै 2025) : दि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीने मागील वर्षी सदस्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ 21 झाडे लावून वृक्षारोपण प्रोजेक्ट राबवला होता. त्यांचा पुष्पहार अर्पण करून व पूजन करून वाढदिवस साजरा केला. नवीन सुरवात यावर्षी देखील पालखी हॉटेलच्या मागे आणखी दहा नवीन झाडे लावून करण्यात आली. यावेळी वड, पिंपळ, बेल, करंज, आवळा, निम, कडुबदाम, शमी अर्जुनसाल प्रजातीचे झाडे मंदिराच्या परिसरात लावण्यात आली. याही झाडांचे पालकत्व ही झाडे मोठी होईपर्यंत तेथील परिसरातल्या लोकांनी घेतले.

डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त
हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबवण्यासाठी त्याला लागणारे रोप हे प्रेसिडेंट सीमा सोनार आणि ट्री गार्ड हे रोटरीन अनिल सहानी यांनी दिले. या प्रसंगी मंगळवार, 1 जुलै रोजी इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटीने डॉक्टर्स डे निमित्त क्लबमधील सदस्या डॉ.मृणाल पाटील, डॉ.किर्ती चांदवडकर, डॉ.आरती चौधरी यांना भेट वस्तू देऊन डॉक्टरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.








मंदिराच्या परिसरात क्लब सदस्य आणि महिला वर्ग उपस्थित होता. प्रोजेक्ट यशस्वी करण्याकरता क्लब अध्यक्ष सीमा सोनार, सेक्रेटरी योगीता वायकोळे, प्रोजेक्ट चेअरमन सदस्या मोना भंगाळे आणि रेवती मांडे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !