भुसावळातील बियाणी स्कूलमध्ये आषाढी ‘दिंडी’ सोहळ्याने वेधले लक्ष

Ashadhi ‘Dindi’ ceremony attracts attention at Biyani School in Bhusawal भुसावळ (6 जुलै 2025) : शहरातील बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा काढला. या सोहळ्याने शहरवासीयांचे लक्ष वेधले.
राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात उत्कृष्टरित्या पावली खेळत विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी विठोबा माऊलीच्या जयघोषात काढली.
मान्यवरांच्या हस्ते आरती
मातृभूमी चौकात उद्योजक मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी, आयुषी बियाणी, प्रवीण भराडिया, किशोर कोलते, किरण कोलते आदींसह शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गांठिया, शाळेचे सुपरवायझर अलीना आदी मान्यवरांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची आरती केली. महिलांनी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी घेण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक झाले.
