सासुबाईंना पाहण्यासाठी आलेल्या पुण्यातील जावयाचा भुसावळात मृत्यू

Son-in-law from Pune dies in Bhusawal after coming to see mother-in-law भुसावळ (7 जुलै 2025) : रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सासुबाईंना पाहण्यासाठी पुण्याहून आलेल्या जावयाचा भुसावळात हृदयविकाराने मृत्यू झाला. प्रवीण दयाराम रंगारे (40) असे मृताचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
काय घडले भुसावळात
रंगारे हे भुसावळातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या सासूबाईंच्या भेटीसाठी शहरात येऊन काही वेळातच ही दुर्दैवी घटना घडली. 5 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता प्रवीण रंगारे हे झोपले होते, त्यांना नाश्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना हलवून पाहिले असता ते निष्प्राण अवस्थेत दिसले. तातडीने त्यांना येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमोल विसपुते करत आहे. प्रवीण रंगारे यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
