शिरपूर तालुका खुनाने हादरला : मित्राचा खून : आरोपीला अटक

Shirpur taluka shaken by murder : Friend’s murder : Accused arrested शिरपूर (8 जुलै 2025) : मित्रांमध्ये झालेल्या वादातून डोक्यात दगड घातल्याने मित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील झेंडेअंजन गावात सोमवार, 7 रोजी रात्री आठ वाजता घडली. या घटनेत देविदास गुलाब बहिरम (36) याचा मृत्यू झाला तर संशयीत तथा मृताचा मित्र विकास विजय महाले (35, दोन्ही रा.झेंडेअंजन) याला अटक करण्यात आली.
उपचारादरम्यान मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, झेंडेअंजन गावात विकास महाले याने देविदास बहिरम याच्या डोक्यात वादानंतर दगड घातला. गंभीर अवस्थेत देविदास गुलाब बहिरम याला उपचारार्थ धुळे सिव्हीलमध्ये हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साक्षीदार छोटीबाई गोटु बहिरम (झेंडे अंजन) यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात शिरपूर पुर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनानंतर अवघ्या काही तासानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, सुनील वसावे, हवालदार कैलास कोळी, हवालदार सुनील पाठक, हवालदार संतोष पाटील, हवालदार संदीप ठाकरे, कॉन्स्टेबल संजय भोई, कॉन्स्टेबल योगेश मोरे, कॉन्स्टेबल मनोज पाटील, कॉन्स्टेबल दिनकर पवार, कॉन्स्टेबल सुनील पवार, कॉन्स्टेबल भूषण पाटील, कॉन्स्टेबल धनराज गोपाळ आदींच्या पथकाने केली.