भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक निकी बतरा म्हणाले ; सर्व धर्माविषयी आदर ; वक्तव्याविषयी गैरसमज

अनावधानाने भावना दुखावल्या गेल्या असल्यास आपली दिलगिरी : निकी बतरा


Former corporator Niki Batra भुसावळ (8 जुलै 2025) : पथविक्रेत्यांबद्दल अपशब्द वापरुन भावना दुखावल्या प्रकरणी भुसावळातील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश उर्फ निक्की बतरा यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांत पथविक्रेता समितीचे अध्यक्ष राजेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या संदर्भात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी संवाद साधताना बतरा म्हणाले की, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आपण त्याबाबत माफी मागत असल्याचे ते म्हणाले.

सर्व धर्माचा आपल्याला आदर
माजी नगरसेवक बतरा म्हणाले की, आपल्याविषयी गैरसमज पसरवण्यात आला असून आपल्याला सर्व धर्माचा आदर आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून वाहतूक समस्येसाठी आपण उद्देशून ते वक्तव्य केले मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला. आपल्याला सर्व धर्माबद्दल प्रेम व आदर असून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास आपण दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी सांगितले.



काय घडले भुसावळात
नगरपालिकेने वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यावरुन पथविक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता. यानंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आठवडे बाजारात पथविक्रेत्यांना जागा देण्याचे निश्चित झाले. यानंतरच्या काळात माजी नगरसेवक निक्की बतरा यांनी एक व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयात टाकला. या व्हिडीओत बतरा त्यांनी पथविक्रेत्यांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !