नेपाळच्या युवकाचा भुसावळमध्ये मृत्यू
गॅलेक्सी हॉटेलजवळील घटनेने खळबळ : पोलिसांकडून तपासावर भर
नेपाळच्या युवकाचा भुसावळमध्ये मृत्यू भुसावळ (9 जुलै 2025) : नेपाळमधून भुसावळ येथे वास्तव्यास असलेल्या 32 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 7 रोजी उघडकीस आली. दिल्ली बाहादुर बी.के. (32, रा. नेपाळ, ह.मु. अली रजा कॉलनी, गॅलेक्सी हॉटेल, सोमर सिताराम फार्म हाऊस, ता. भुसावळ) असे मृताचे नाव आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस तपास सुरू आहे.
काय घडले भुसावळात
दिल्ली बाहादुर याला अचानक हातपाय दुखण्याचा त्रास सुरू झाला. यावेळी त्याचे हातपाय चोळण्यात आले, घटनेच्या वेळी उपस्थित व्यक्तींनी हॉटेलमधील मुख्य शेफ रेहान शेख यांना माहिती दिली. ते त्वरित घटनास्थळी आले आणि नेपाळ येथील व्यक्ती दिल्ली याला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले.

प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला ट्रामा केअर हॉस्पिटल, येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र तेथे नेल्यावर डॉ. कल्पेश पाटील यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
