खिरोद्याच्या लाचखोर मुख्याध्यापिकेसह क्लर्कची जामिनावर सुटका


Khirodya’s corrupt principal and clerk released on bail भुसावळ (9 जुलै 2025) : विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी 36 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित खिरोदा, ता.रावेर गावातील धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (57, रा.चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (27, रा.उदळी, ता.रावेर) यांना धुळे एसीबीने सोमवारी सायंकाळी अटक केली होती. संशयीतांना अटक केल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर संशयीताना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अटी व शर्तीवर त्यांना जामीन मंजूर केला.

असे आहे लाच प्रकरण
या प्रकरणातील 61 वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत. प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी 2 जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला व तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना पाच हजार प्रमाणे सहा महिन्यांचे 30 हजार रुपये मागण्यात आले. 7 रोजी तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी लाचेची रक्कम एकूण सहा महिन्यांसाठी 36 हजार रुपये मागण्यात आली व कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारताच मुख्याध्यापिकेलाही अटक करण्यात आली. हा सापळा धुळे एसबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आला व कारवाईनंतर प्रकरण तपासार्थ जळगाव एसीबीला देण्यात आले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !