रावेर पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई : दोन लाख 34 हजारांचा साठा जप्त
Raver police take major action against gutkha : Stock worth Rs 2.34 lakh seized रावेर (9 जुलै 2025) : रावेर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे दोन लाख 34 हजारांचा गुटखा केला. एकाला अटक करण्यात आली असून तीन पसाार आहेत. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
मध्य प्रदेशातील बर्हाणपूर टाटा कंपनीच्या गाडीतून (एम.एच.04 एच.एन.1709) क्रमांकाच्या गुटख्याचा मोठा साठा रावेर शहरात आणला जात असल्याची माहिती रावेर पोलिस निरीक्षक विशाल जैस्वाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी निददृश दिल्यानंतर पथकाने स्वस्तिक टॉकीजजवळील बर्हाणपुर रोडवर छापा टाकून ही गाडी ताब्यात घेतली.

वाहनांची तपासणी केली असता, त्यात एकूण दोन लाख 34 किंमतीचा गुटखा आढळून आला. गुटख्यासोबतच गुटखा वाहून नेणारी चार लाख रुपये किंमतीची गाडीही जप्त करण्यात आली. सहा लाख 34 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात शेख मुजाहिद शेख रफिक, आसीफ अहमद जमील अहमद, कल्लू उर्फ मोहसिन शेख युनुस शेख आणि एक अनोळखी इसम अशा चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुजाहिदला अटक करण्यात आली.
