चितोडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राधिका पंकज वारके


Radhika Pankaj Warke appointed as Vice Sarpanch of Chitoda Gram Panchayat यावल (10 जुलै 2035) : यावल तालुक्यातील चितोडा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. उपसरपंच म्हणून राधिका पंकज वारके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर सत्ताधारी गटाने जल्लोष केला.

रिक्त पद असल्याने निवड
चितोडा येथील ग्रामपंचायतीच उपसरपंच प्रदीप धांडे यांनी राजीनामा दिल्याने त्याच्या रिक्त जागी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी सकाळी उपसरपंच निवडीकरीता सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अरुण पाटील होते.

या सभेत उपसरपंच पदा करीत राधिका पंकज वारके यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. सर्वानुमते त्यांच्या नावावर शिक्कामार्तब करण्यात आले होते व औपचारीक पध्दतीने त्यांची निवड घोषीत करण्यात आली. तेव्हा त्यांच्या निवडीनंतर सत्ताधारी पक्षाकडून जल्लोष करण्यात आला.

प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुरकुरे, चंद्रकांत जंगले, मावळते उपसरपंच प्रदीप धांडे, योगेश भंगाळे, बेबीबाई कडू पाटील, सिंधूबाई ज्ञानदेव टाँगळे, हर्षा गोकुळ पाटील व उज्वला संदीप पाटील हे सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रशासकिय कामकाज ग्रामसेवक तळेले यांनी पार पाडले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !