भुसावळ तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींवर असेल ‘महिला राज’
आरक्षण सोडत : अनुसूचित जाती 4, जमाती 4, नामाप्र 6, जनरल 7 जागांवर संधी
‘Mahila Raj’ will be in place in 21 Gram Panchayats in Bhusawal taluka भुसावळ (10 जुलै 2025) : भुसावळ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी महिला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी बुधवार, 9 जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेला ग्रामपंचायतींचे सदस्य, ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य,आजी-माजी पदाधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
असे असेल आरक्षण
या सभेत अनुसूचित जाती 4, जमाती 4, नामाप्र 6, जनरल 7 अश्या एकुण 21 ग्राम पंचायतीवर महिला राज राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात बुधवार, 9 रोजी भुसावळ तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या महिला सरपंच पदाचे आरक्षण काढण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन तहसीलदार निता लबडे यांनी केले होते. यावेळी नायब तहसीलदा शोभा घुलेसह महसूल कर्मचारी उपस्थित होते. आरक्षण सोडतीची चिठ्ठी तोषल राऊन या सहा वर्षाच्या मुलाने काढली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती-महिला पदासाठी ग्रामपंचायत
प्रांताधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या आरक्षणात अनुसूचीत जाती महिला सरपंच पदासाठी पिंपळगाव खुर्द, खंडाळे, चोरवड खेडी बुद्रूक, खडके या ग्राम पंचायतीचा समावेश आहे. येथे अनुसूचीत जाती महिला सरपंच राहणार आहे.
अनुसूचित जमाती, नामाप्र पदाच्या ग्रामपंचायत
अनुसूचित जमाती पदाच्या महिला सरपंच पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात फेकरी, फुलगाव, साकरी, दर्यापूर या गावांचा समावेश आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सरपंच पदासाठी निश्चित झालेल्या ग्राम पंचायतीमध्ये वराडसीम, शिंदी, विल्हाळे, ओझरखेडा, पिंपळगाव बुद्रूक व सुनसगाव या ग्राम पंचायतीचा समावेश आहे.
सर्वसाधारण महिलांसाठी
2025 ते 2030 या काळात होणार्या ग्राम पंचायतीच्या निवडणूकीसाठी सर्व साधारण महिलासाठी निश्चित केलेल्या ग्राम पंचायतींसाठी अंजनसेांडे, कन्हाळे खुर्द, बेलव्हाय, कठोरे बुद्रूक, कठोरे खुर्द, बोहर्डी बु – बोहर्डी खुर्द आणि साकेगाव या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.




