विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी : भुसावळात प्राचार्य निना कटलर

Principal Nina Cutler भुसावळ (17 जुलै 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये प्रिंसीपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती दिली. सध्या डेंगू, मलेरिया, कावीळ, टॉयफाईड, थंडी, ताप, खोकला, सर्दी अश्या विविध प्रकारच्या आजाराची साथ सुरू असल्याने सर्वत्र दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना आजारापासून बचाव होण्यासाठी ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये प्राचार्य कटलर यांनी विद्यार्थ्याना विवीध टिप्स दिल्या.
स्वतःसह घ्यावी परिवाराची काळजी
शाळेतून घरी गेल्यावर हात-पाय व्यवस्थित धुवून बसावे तसेच कुणीही विद्यार्थी आजारी असल्यास त्याने स्वतःचे टावेल, साबण हे वेगळे ठेवावे व जास्तीत-जास्त स्वच्छता ठेवावी. पाणी गाळून व उकळून प्यावे, शिळे अन्न खाऊ नये तसेच बाहेरील उघड्यावरील अन्न खाऊ नये, घराबाहेर शक्यतो जाऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी गोळ्या घ्याव्यात तसेच स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी.