शनैश्वर बनावट अॅप प्रकरण : आरोपीविरोधात गुन्हा

Shaneeshwar fake app case : Case filed against accused अहिल्यानगर (19 जुलै 2025) : शनैश्वर देवस्थानच्या बनावट पप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पाच यूआरएलधारक (अॅप तयार करणारे) व त्यांना मदत करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता सायबर ठाण्याने रविवारी तपासासाठी पथके नियुक्त केली.
अहिल्यानगर सायबर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. संकेतस्थळ व अॅप तयार करून देवस्थानची परवानगी न घेता ऑनलाइन पूजा, व्हीआयपी दर्शन, पूजा अभिषेक, तेल चढविणे यासाठी अनियमित दराने शुल्क घेऊन शनिभक्तांची फसवणूक केली. आरोपींनी पुजारी नेमून अवैधरीत्या ऑनलाइन पद्धतीने पैसे उकळले. यातून शनिभक्त व देवस्थानची फसवणूक झाली. त्यामुळे बनावट अॅप तयार करणारे व त्याचा वापर करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.