वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप : ईनरव्हील रेल सिटीचा उपक्रम

भुसावळ (18 जुलै 2025) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ही शाळा क्लबने दत्तक घेतली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन सुलभ व प्रेरणादायी व्हावे यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
या प्रकल्पाचे प्रकल्प चेअरमन किरण पोलाडिया असून प्रकल्पासाठी आर्थिक सहकार्य प्रकल्प प्रायोजक मनीष पाचपांडे यांनी केले. या उपक्रमांतर्गत वीट भट्टीवर काम करणार्या कुटुंबातील 24 विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सील, खोडरबर, पट्टी , शालेय बॅग आणि पाऊच यांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमात क्लब अध्यक्षा सीमा सोनार, सचिव योगीता वायकोले, सदस्य मोना भांगले, अदिती भडांग, डॉ.मृणाल पाटील, सुनीता पाचपांडे, रंजीत कौर, रेवती मांडे यांची उपस्थिती होती.
क्लबतर्फे शाळेच्या शिक्षक नरेंद्र कोळी व कर्मचार्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
