आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत भुसावळचा डंका : चिमुकल्या तीर्थराज पाटीलने पटकावले सुवर्णपदक

भुसावळ (19 जुलै 2025) : एमटीएल इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक थायलंड व रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सातव्या आंतराष्ट्रीय रोलर रिले चॅम्पियनशिप थायलंड स्पर्धा 18 जुन 2025 ते 19 जुन 2025 दरम्यान झाली. या स्पर्धेमध्ये भारत रशिया, थायलंडसह अन्य सहा देशातील स्केटर यांनी सहभाग घेतला.
या आंतरराष्ट्रीय स्केटींग स्पर्धेत आठ वर्ष वयोगटातील इनलाईन व क्वाडस स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील सिल्वर लाईन स्पोर्ट्स अॅकेडमीचा स्केटर व एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील याने दोन सुवर्णपदक मिळविले व रिले मॅचमध्ये तीन रजत पदक मिळवून तो विजयी झाला. त्याला एम.टी.एल.इंडोअर गेम्स ऑफ स्पीड स्केट बँकॉक, थायलंड यांच्यातर्फे अर्बन ट्राफी देण्यात आली. तीर्थराज हा भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दुसर्या वर्गातील विद्यार्थी आहे.