भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात वैज्ञानिक उपकरणांचे प्रदर्शन


K. Narkhede School भुसावळ (20 जुलै 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरणांची ओळख व माहिती होण्यासाठी वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग प्रात्यक्षिकांच्या दरम्यान कसा करावा या संदर्भात प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, एस.पी.पाठक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरेश कापसे यांनी विलगकारी नरसाळे, मोजनळी, मोजपात्र, शंकू पात्र, शोषनळी, तापमापी, कॅलरी मापी, चिमटा, वायू पात्र, भिंग, व्होल्ट मीटर , ऍमीटर अशा विभिन्न 30 उपकरणांची माहिती दिली.


पट्टी चुंबक हा दक्षिणोत्तर स्थिर का राहतो याचे कारण सुद्धा विषद केले. व्ही.एस.राणे यांनी चुंबकाचे गुणधर्म तसेच ध्रुव यांची माहिती कथन केली तसेच ग्यालहोनामीटर, काचेची चिप व भिंगाची माहिती व उपयोग सांगून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकली.

याप्रसंगी विद्यालयातील विज्ञान शिक्षक भानुदास जोगी, नितीन पाटील, एस.व्ही.जावळे, नेहा पाटील, वैशाली महाजन, स्वाती नेहेते, हेमलता जंगले, एन.व्ही.जावळे, लॅब असिस्टंट पंकज गाजरे, आसीफ तडवी, केतन जावळे, माधव बाविस्कर इत्यादी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !