भुसावळातील कोळी समाजातर्फे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप


भुसावळ (20 जुलै 2025) : कोळी समाज विकास मंडळातर्फे शहरातील कोळी समाजातील दहावी, बारावी, पदवी, इतर शैक्षणिक आणि खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाज विकास मंडळाची ट्रॉफी, शैक्षणिक साहित्य, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी समाजातील 150 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यांची प्रमुख उपस्थिती
अध्यक्षस्थानी दिलीप सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ तायडे, अशोक सोनवणे, प्रदीप सोनवणे, सतीश सपकाळे, डॉ.दिवाकर पाटील, नारायण कोळी, शांताराम कोळी, वसंत सपकाळे, सुनंदा सपकाळे, कल्पना तायडे, सुकेशिनी कोळी उपस्थित होत्या.


दिलीप सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाची कास धरण्याचे व उच्च ध्येय ठेवावे यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा, असे सांगितले.

यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रकांत सूर्यवंशी, दत्तात्रय सपकाळे, रवींद्र बाविस्कर, दीपक सोनवणे, महारु कोळी, प्रदीप सपकाळे, कैलास सोनवणे, विजय तावडे, संदीप कोळी, धर्मराज कोळी, गोकुळ सपकाळे, आनंदा दोडे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन दीपक सोनवणे यांनी मानले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !