जय गणेश फाऊंडेशन निस्पृहपणे कार्य करणारी संस्था : रमण भोळे

सर्वसाधारण सभेत कर्तृत्ववान व्यक्तींचा झाला सन्मान


Jai Ganesh Foundation is an organization that works impartially : Raman Bhole भुसावळ (20 जुलै 2025) : भुसावळ शहरातील जय गणेश फाउंडेशन या संस्थेची 18 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.सुधा खराटे आदी उपस्थित होते.

मान्यवरांचा झाला सन्मान
यावेळी भुसावळ शहरातील विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या दहा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना क्रीडा शिक्षक रमण भोळे यांनी जय गणेश फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रा.सुधा खराटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव तुकाराम आटाळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र यावलकर यांनी पुढील नियोजित उपक्रमांची माहिती दिली. ‘सन्मान कर्तृत्वाचा’ अंतर्गत सन्मान करण्यात आलेल्या व्यक्तींचा परिचय फाऊंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन हर्षल वानखेडे याने केले.


सभा यशस्वीतेसाठी राहुल भावसेकर, तुषार झांबरे, प्रवीण पाटील, निलेश कोलते, नचिकेत यावलकर, मनोज चौधरी, विशाल आहुजा, दगडू पाटील आदींनी प्रयत्न केले.

यांचा झाला सन्मान
रमण भोळे, विश्वनाथ पाटील, बाळकृष्ण झांबरे, विरेंद्र पाटील, नुपूर भालेराव, राजेंद्र जावळे, अजय आंबेकर, सौ.प्रिया पाटील, ज्ञानेश धांडे, विरेंद्र फिरके






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !