नाशिक परिक्षेत्रातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या : जळगाव जिल्ह्यातून या अधिकार्यांच्या बदल्या

Transfer of four police inspectors in Nashik area: Transfer of these officers from Jalgaon district भुसावळ (20 जुलै 2025) : नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी परिक्षेत्रातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील दोन पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
पोलिस निरीक्षकांनी केलेल्या विनंतीचा सांगोपांग विचार करून विशेष बाब म्हणून काही निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक नाशिक दत्तात्रय कराळे यांनी काढले आहेत.

नाशिक ग्रामीण येथील हेमंतकुमार भामरे यांना नाशिक ग्रामीणला कायम ठेवण्यात आले आहे.
जळगावातील पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली.
चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांची नाशिक ग्रामीणमध्ये बदली करण्यात आली.
नंदुरबार येथील हेमंतकुमार प्रभाकर पाटील यांना नंदुरबार येथे कायम ठेवण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्याने पुढे जिल्ह्यात कोण नवीन अधिकारी येणार? याची उत्सुकता लागून आहे.
