पाचशे रुपयांची लाच भोवली : मोलगी पोलीस ठाण्याचा हवालदार एसीबीच्या जाळ्यात

गणेश वाघ
ACB arrests constable of Molgi police station for accepting bribe of Rs 500 भुसावळ (3 ऑगस्ट 2025) : प्रवासी वाहतूक करणार्या वाहनावर कारवाई न करता दर महिन्याला एक हजारांची लाच मागून पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य करीत लाच स्वीकारणार्या मोलगी, ता.अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील हवालदाराला नंदुरबार एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. मिलाप बाळू शिंदे (44) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
39 वर्षीय तक्रारदार जामली, मोलगी, ता.अक्कलकुवा येथे वास्तव्य करतात. त्यांनी 1 रोजी एसीबीकडे मोलगी ठाण्यातील हवालदार मिलाप शिंदे यांच्याविरोधात तक्रार दिली. प्रवासी वाहतूक करू देण्याच्या मोबदल्यात एक हजारांची लाच मागून पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर सापळा रचून सोमवार, 3 रोजी आरोपी हवालदाराला अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वात विलास पाटील, देवराम गावीत, हेमंतकुमार महाले, जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.