धुळे हादरले : रायफलमधून गोळी सुटल्याने ईव्हीएम सुरक्षेसाठी तैनात हवालदार गंभीर
जखमी कर्मचार्यावर दोनदा निलंबनाची कारवाई : एसीबीच्या सापळ्यातही अडकला

Dhule shaken : Constable posted for EVM security critical after bullet fired from rifle धुळे (7 ऑगस्ट 2025) : ईव्हीएम सुरक्षेसाठी तैनात असलेला हवालदार एसएलआर रायफलमधील गोळी सुटताच गंभीर जखमी झाला आहे. अत्यवस्थ अवस्थेत हवालदाराने मुलाला घटना कथन केल्यानंतर मुलाने आझादनगर पोलिसांना सूचित करीत धाव घेतली. दरम्यान, नेमकी घटना कशी घडली? याबाबत अस्पष्टता असून जखमीवर सेवा रुग्णालयात उपचार ुसरू आहेत. विशेष म्हणजे हवालदारावर यापूर्वी एसीबीची कारवाई झाली असून त्यांना दोन वेळा निलंबितही करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उमेश दिनकर सूर्यवंशी (48) असे जखमीचे नाव आहे.
काय घडले धुळे शहरात?
धुळे बाजार समितीच्या आवारात वखार महामंडळाचे गोडाउनमध्ये ठेवलेल्या इव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकी असून त्यात बुधवार, 6 रोजी सकाळी 8 वाजता हेडकॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी (48) आले व त्यांनी दीपक पाटील यांच्याकडून चार्ज घेतला. चौकीत एसएलआर रायफलसह ते बंदोबस्तावर असताना सकाळच्या सुमारास गोळी झाडल्याचा आवाज झाला व काही वेळेत जखमी अवस्थेत कर्मचार्याने मुलाला फोन करीत घटनेची माहिती कळवली.
जखमी कर्मचार्याचया मुलगा दर्शन व यश यांनी रुग्णवाहिका आणली सूर्यवंशी यांना हिरे रुग्णालय व नंतर साक्री रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
कर्मचार्यावर एसीबीने केली होती कारवाई
सूर्यवंशी हे धुळे एसआरपीमध्ये होते. या ठिकाणी त्यांनी 7 जून 2008 रोजी गैरवर्तन केले होते. यानंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असताना 4 मे 2023 रोजी 200 रुपयांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतले होते. चाळीसगावच्या एका शिक्षकाने याबाबत तक्रार दिली होती. या दोन्ही वेळेस त्यांना निलंबित करण्यात आले तर जानेवारी महिन्यात त्यांच्यावर धुळे शहर पोलिसांत अदखलपात्र तक्रार दाखल झाली.
अद्याप कारण अस्पष्ट : पोलिस अधीक्षक
गोळीबाराचे कारण अजून अस्पष्ट हेड कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी स्वतःहून गोळी झाडली की चुकून लागली हे अजून स्पष्ट झालेले नाही. सध्या ते उपचार घेत असून, बोलण्याच्या स्थितीत नाही. पोलिस आपला तपास करत आहे. लवकरच कारण स्पष्ट होईल. असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे म्हणाले.