जळगावात धाडसी घरफोडी : धुळ्यातील अट्टल चोरटे चार लाखांच्या मुद्देमालासह जाळ्यात


Daring house burglary in Jalgaon : Thieves from Dhule caught with valuables worth Rs. 4 lakhs जळगाव (7 ऑगस्ट 2025) : धुळे शहरातील अट्टल घरफोड्या करणार्‍या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी जळगाव जवळीलल खेडी शिवार, शिवनगर परिसरातील शंभू रेसिडेन्सीत 13 जानेवारी रोजी केलेल्या घरफोडी प्रकरणी अटक केली आहे. आरोपींकडून तीन लाख 97 हजार 199 रुपये किंमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कैलास चिंतामण मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव (दोन्ही रा.सोनगीर, ता.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

खेडी परिसरात शंभू रेसिडेन्सीमधील रवींद्र मगरे यांच्या फ्लॅट क्रमांक 4 मधून 13 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते.




तपासादरम्यान ही घरफोडी आरोपी कैलास चिंतामण मोरे आणि जयप्रकाश राजाराम यादव (दोन्ही रा. सोनगीर, धुळे) यांनी केल्याचे निष्पन्न होताच 31 जुलै रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना 7 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आरोपी कैलास मोरे याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर, पोलिसांनी सोनगीर (ता. जि. धुळे) येथील त्याच्या घरी जाऊन चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी तीन लाख 81 हजार 514 रुपये किमतीची 39 ग्रॅम सोन्याची लगड आणि 15 हजार 685 रुपये किंमतीचे 135 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख 97 हजार 199 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि निलेश पाटील करीत आहेत.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार रामकृष्ण पाटील, कॉन्स्टेबल निलेश पाटील, कॉन्स्टेबल विशाल कोळी, कॉन्स्टेबल राहुल रगडे यांच्या पथकाने केली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !