धुळ्यातील ‘गोळीबाराची घटना’ रायफल हाताळताना ट्रीगर दबल्यानेच : जखमी कर्मचार्‍याचा जवाब


The ‘shooting incident’ in Dhule was caused by the trigger being pressed while handling the rifle: Injured employee’s statement धुळे (7 ऑगस्ट 2025) : ईव्हीएम सुरक्षेसाठी तैनात असलेला हवालदार एसएलआर रायफलमधील गोळी सुटताच गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार, 6 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धुळ्यातील धुळे बाजार समितीच्या आवारात वखार महामंडळाचे गोडावूनजवळील पोलिस चौकीत घडली होती. या घटनेत हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी (48) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा पोलिसांनी जवाब नोंदवला असून रायफल साफ करताना ती लोड झाली व ट्रीगर दबताच गोळीबार झाल्याचे सूर्यवंशी यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे.

काय घडले धुळे शहरात
पोलीस कर्मचारी यांनी बुधवारी सकाळी दीपक पाटील यांच्याकडून चार्ज घेतला. चौकीत एसएलआर रायफलसह ते बंदोबस्तावर असताना ती रायफल स्वच्छ करीत असताना त्यांच्याकडून ती लोड झाली व ट्रीगर दबल्याने गोळी सुटून हवालदार जखमी झाला. व काही वेळेत जखमी अवस्थेत कर्मचार्‍याने मुलाला फोन करीत घटनेची माहिती कळवली.




जखमी कर्मचार्‍याचा मुलगा दर्शन व यश यांनी रुग्णवाहिका आणल्यानंतर सूर्यवंशी यांना हिरे रुग्णालय व नंतर साक्री रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

कर्मचार्‍यावर एसीबीने केली होती कारवाई
सूर्यवंशी हे धुळे एसआरपीमध्ये होते. या ठिकाणी त्यांनी 7 जून 2008 रोजी गैरवर्तन केले होते. यानंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत असताना 4 मे 2023 रोजी 200 रुपयांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतले होते. चाळीसगावच्या एका शिक्षकाने याबाबत तक्रार दिली होती. या दोन्ही वेळेस त्यांना निलंबित करण्यात आले तर जानेवारी महिन्यात त्यांच्यावर धुळे शहर पोलिसांत अदखलपात्र तक्रार दाखल झाली.

रायफल हाताळताना गोळीबार
सूत्रांच्या माहितीनुसार, कर्मचारी सूर्यवंशी हे रायफल हाताळत असताना गोळी सुटली व तीन लागून ते गंभीर जखमी झाले. कौटूंबिक, शासकीय अथवा इतर कोणताही त्यांना त्रास नसल्याचे त्यांनी जवाबात म्हटले आहे. आझादनगर पोलिस निरीक्षक या प्रकरणाची चौकशी करीत आहे.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !