धरणगाव तालुका हादरला : दारूला पैसे न देणार्या पित्याला संपवले
Dharangaon taluka shaken : Father killed for not paying for alcohol धरणगाव (12 ऑगस्ट 2025) : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पित्याचा विळ्याने हल्ला मारून खून करण्यात आल्याची घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी घडली. छगन यादव कोळी (75) असे मृत पित्याचे तर समाधान छगन कोळी (42) असे अटकेतील आरोपी मुलाचे नाव आहे.
असे आहे नेमके प्रकरण ?
चांदसर येथे मंगळवार, 5 रोजी रात्री दहा वाजेाच्या सुमारास छगन कोळी व त्यांचा मुलगा समाधान यांच्यात दारू पिण्यावरून वाद झाला. समाधान हा वडिलांकडे दारुसाठी पैसे मागायचा आणि यासाठी त्रासही देत होता. 5 ऑगस्ट रोजी त्याने वडिलांकडे दारुसाठी पैसे मागितले. पण वडिलांनी पैसे न दिल्याने समाधान याने घरात असलेल्या विळ्याने वडिलांच्या पोटावर वार केले. यात ते जखमी झाले. त्यांना रात्रीच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सोमवार, 11 रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.





