जामनेर हादरले : जमावाच्या मारहाणीत बेटावदच्या तरुणाचा मृत्यू


Jamner shaken: Youth from Betawad dies after being beaten by mob जामनेर (12 ऑगस्ट 2025) : संशयावरून जमावाने बेदम मारहाण केल्याने बेटावद खुर्द गावातील तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जामनेर शहरात सोमवारी घडली. या घटनेनंतर मृताचे नातेवाईक संतप्त झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहरात अतिरीक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी तळ ठोकून आहेत. सुलेमान रहिम खान पठाण (21, बेटावद खुर्द, ता.जामनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय घडले जामनेरात
जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावातील सुलेमान रहिम खान पठाण (21) याने सोमवारी सकाळी आपल्या वडील व आजोबांसोबत शेतातील काम केले. यानंतर जामनेर येथे पोलिस भरतीचा अर्ज भरून येतो, असे सांगून तो घरातून निघाला. तिथून एका सायबर कॅफेवर बसला असतानाच संशयावरून त्यास कॅफेबाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आली व तशाच मार खालेल्या अवस्थेत व फाटलेल्या कपड्याने रहिमम घरी पोहोचला व कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच तो भोवळ येऊन कोसळला.






नातेवाईक संतप्त :अधीक्षकांची धाव
बेशुद्धावस्थेत रहिमला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी करीत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी दाखल झाले तसेच पाच एसआरपीच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या.

दोघे ताब्यात अन्य संशयीतांचा शोध सुरू
घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून अन्य दहा संशयीतांची ओळख पटवली आहे व त्यांच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !