दाम्पत्यातील वादानंतर दिड वर्षीय चिमुकल्याला दुसर्‍या मजल्यावरून फेकताच मृत्यू


One and a half year old child dies after being thrown from second floor after argument between couple नवी दिल्ली (12 ऑगस्ट2025) : पतीशी झालेल्या भांडणानंतर आईने संतापात दीड वर्षाच्या मुलाला दुमजली घराच्या छतावरून फेकताच त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ही घटना घडली.

मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हापूरमधील नगर कोतवाली परिसरातील मोहल्ला मजिदपुरा येथे राहणार्‍या वसीमचं 5 वर्षांपूर्वी बिहारमधील रहिवासी शबानाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर शबानाला दोन मुलं झाली.




वसीमचा आरोप आहे की, त्याची पत्नी घरात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत असे. भांडणाच्या वेळी तिने रागावून दीड वर्षाचा मुलगा अहदला तिच्या मांडीवर उचललं आणि दुमजली घराच्या छतावरून खाली फेकलं. या घटनेनंतर घरात खूप आरडाओरडा झाला.

घटनेनंतर वडील वसीम यांनी शहर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी महिलेला ताब्यात घेतलं.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !