जबरी लूट करणारी धुळ्यातील शिकलकर टोळी तडीपार

धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश : गुन्हेगारी वर्तुळात खळबळ


Shikalkar gang from Dhule who committed robbery and looting was arrested धुळे (13 ऑगस्ट 2025) : गुन्हेगारी वर्तुळात जबरी चोरी तसेच लूटमारीसाठी कुख्यात असलेल्या शिकलकर (भादा) टोळीतील त्रिकूटाला धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 अन्वये मिळालेल्या अधिकारान्वये एक वर्षांसाठी धुळे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशाच पद्धत्तीने गुन्हेगारांनी शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हद्दपार झालेल्यांमध्ये चॅम्पियन सिंग मिलनसिंग भादा (24) या टोळी प्रमुखासह बरसात कौर मिलनसिंग भादा (42) आणि फतेसिंग मिलनसिंग भादा (20, सर्व रा.दिडशे खोली, वनश्री कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे) यांचा समावेश आहे.




त्रिकूटाविरोधात दहा गंभीर गुन्हे
हद्दपार संशयितांविरोधात मोहाडीनगर पोलिस ठाण्यात पाच, धुळे तालुका पोलिसात दोन, चाळीसगाव रोड, वडनेर खाकुर्डी (नाशिक ग्रामीण), बार्शी (जि.सोलापूर) आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 2019 पासून विविध स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. हत्या, घातक हत्यारांनी दुखापत करणे, दंगा, चोरी करणे यांसह बेकायदेशीरपणे एकत्र येऊन जमाव जमविणे, दरोडा घालण्याचा प्रयत्न करणे, पुरावा नष्ट करणे, कट रचणे, घातक शस्त्र बाळगणे, घरफोडी, विनयभंग करण्याच्या उद्देशाने महिलेवर हल्ला करणे, धार्मिक भावना दुखावणे, जातीवाचक शिवीगाळ करणे यासारखे गंभीर गुन्हे शिकलकर (भादा) टोळीवर दाखल आहेत.

पोलिस अधीक्षकांनी अधिकाराचा वापर करीत केले हद्दपार
गुन्हेगारी टोळीमुळे नागरिकांच्या जिवितास, मालमत्तेस धोका निर्माण झाल्याने मोहाडीनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक शशिकांत पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याकडे या संशयितांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये धुळे जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांनी चौकशी केली व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांनी प्रस्तावाची छाननी केली. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कलम 55 अधिकाराचा वापर करीत तिघांना एक वर्षांसाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार केले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, मोहाडी पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, चेतन मुंडे, संतोष हिरे, हर्षल चौधरी, कबीर शेख व रमेश शिंदे आदींच्या पथकाने केली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !