विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाद्वारे घ्यावी भरारी : खंडलाय विद्यालयात अरुण भदाणे

Students should take flight through higher education: Arun Bhadane at Khandlai Vidyalaya खंडलाय, ता.धुळे (15 ऑगस्ट 2025) : विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करून भरारी घ्यावी व देशाचे, राज्याचे , तालुक्याचे व आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे, असे आवाहन खंडलाय येथील भटाई देवी माध्यमिक विद्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्यात अरुण गुलाबराव भदाणे यांनी स्वातंत्र्यदिनी केले.
खंडलाय गावाचे माजी सरपंच स्व.जिभाऊ दगा एल.जी.भदाणे – पाटील यांच्या स्मरणार्थ स्व.दगा जिभाऊ प्रतिष्ठान खंडलाय यांच्या वतीने दहावीत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अरुण गुलाबराव भदाणे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह स्वरूपात ट्रॉफी भेट देण्यात आली. याप्रसंगीत ते बोलत हाते.
यावेळी दहावीत विद्यालयातून प्रथम आलेल्या गौरी प्रताप बागुल, द्वितीय आलेल्या निखील आनंदा पाटील व तृतीय आलेल्या वैभव दत्तात्रय जाधव यांचा मान्यवरांनी गौरव केला.
शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद समस्त स्टाफ या सर्वांना ध्वजारोहणानंतर गौरवण्यात आले. प्रसंगी भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडलायचे मुख्याध्यापक व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक एस.एम.देवरे यांनी आभार मानले.