भुसावळात शहरातील महिलेला मारहाण करीत गैरवर्तन


Woman beaten and abused in Bhusawal भुसावळ (17 ऑगस्ट 2025) : शहरातील एका महिलेला मध्यरात्री दारूच्या नशेत घरात घुसून शिवीगाळ, मारहाण व गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयीत दामोदर नथ्थू पाटील (राजपूत) याच्या विरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

काय घडले भुसावळ शहरात
बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 12 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजता संशयीत दामोदर नथ्थू पाटील (रा. केशर नगर, जामनेर रोड, भुसावळ) हा दारूच्या नशेत महिलेच्या घरात अनधिकृतरित्या शिरला. त्याने घरात प्रवेश करताच महिलेच्या कानशिलात मारहाण केली तसेच अश्लील शिवीगाळ करून तिचा हात पकडत अंगावर ओढून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या घटनेदरम्यान महिलेच्या भावालाही दामोदरे पाटील याने मारहाण केली. घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संशयीताविरुद्ध मारहाण, शिवीगाळ,घरात अनधिकृत प्रवेश व महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !