मनोविकृत भूषण पाटीलला बाजारपेठ पोलिसांनी पुन्हा ठोकल्या बेड्या : हे कारण आले समोर
आतापर्यंत आरोपीविरोधात तीन गुन्हे दाखल : मनोविकृतावर कठोर कारवाईची मागणी
The mentally disturbed Bhushan Patil was shackled again by the market police : This reason has come to light भुसावळ (17 ऑगस्ट 2025) : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल फेसबुक लाईव्ह करून अपशब्द वापरणार्या साकेगावातील रहिवासी व डोंबिवलीस्थित भूषण पाटील विरोधात भुसावळ शहर पोलिसात अॅट्रासिटीसह विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी मनोविकृत असलेल्या भूषण पाटीलने मंत्री संजय सावकारे सावकारे यांच्याविरोधात तसेच महामानवाविषयी अपशब्द वापरल्याने भुसावळ बाजारपेठसह वरणगाव पोलिसात तीन गुन्हे दाखल आहेत हेही विशेष !
आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी
गणेश अशोक सपकाळे (कवाडे नगर, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 14 रोजी सायंकाळी सात वाजता संशयीत भूषण बी.पाटील या विकृताने स्वतःच्या पत्नीविषयी व विशिष्ट समाजाविषयी अपशब्द वापरले तसेच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी भूषणला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत करीत आहेत.
यापूर्वी आरोपीविरोधात तीन गुन्हे
वरणगावभुसावळ बाजारपेठ पोलिसात भूषण पाटील विरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली तक्रार सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी दाखल केली आहे. भूषण पाटील या संशयीताने 5 रोजी लहान बंधू व मंत्री संजय वामन सावकारे यांच्या विषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग करून त्यांची बदनामी केली तसेच आमचे दैवत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. दुसरी तक्रार माजी नगरसेवक किरण भागवत कोलते यांनी दाखल केली आहे. आरोपी भूषण पाटील (डोंबिवली) याने आमच्या समाजाबद्दल भावना दुखावणारे वक्तव्य केले तसेच अश्लील शिविगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तिसरी तक्रार दिलीप सुरवाडे (ओझरखेडा) यांनी वरणगावत पोलिसात दाखल केली. त्यानुसार आरोपी भूषण बी.पाटील विरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत भूषण पाटील नामक व्यक्तीने 5 रोजी फेसबुक लाईव्ह करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपमानजनक शब्दांचा प्रयोग केला शिवाय मंत्री संजय सावकारे यांच्याविषयीदेखील जातीवाचक अपमानजनक अपशब्द वापरून त्यांची बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.