नंदुरबार गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : 60 हून अधिक घरफोड्या करणारा कुख्यात जिमी जाळ्यात

धुळे जिल्ह्यात तीन तर नंदुरबारात घरफोडीची कबुली : सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त


Nandurbar Crime Branch’s big achievement : Notorious Jimmy, who committed more than 60 house burglaries, caught नंदुरबार (18 ऑगस्ट 2025) : नंदुरबार गुन्हे शाखेने 60 हून अधिक घरफोड्या करणार्‍या कुख्यात गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने धुहे जिल्ह्यात तीन तर नंदुरबार शहरात नव्याने एक गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. जिमी उर्फ दीपक बिपीन उर्फ अरमीत शर्मा (32, प्लॉट नंबर चार अ, गुरुकुल नगर, नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून सहा लाख 25 हजार 800 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील सायबर कॅफे चालक हर्षल सोनार (कोकणी हिल, नंदुरबार) यांच्या घरातून भर दिवसा सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होता. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना या गुन्ह्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. जिमी उर्फ दीपक शर्मा हा शहरातील गुरुकुल नगरात आल्यानंतर त्यास पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी बोलते करताच आरोपीने सोन्याचे दागिने, मोबाईल व असा एकूण सहा लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. आरोपीने धुळे जिल्ह्यात तीन तर नंदुरबार जिल्ह्यात एक घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीविरोधात जिल्ह्यात तसेच परराज्यातील गुजरात, हरियाणा, राजस्थान आदी भागात 60 हून अधिक गुन्हे दाखल आहेहत.




यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, शहर पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण, गुन्हे शाखेचे हवालदार मोहन ढमढेरे, नाईक अविनाश चव्हाण, शिपाई अभय राजपूत, शहर ठाण्याचे हवालदार दीपक बुनकर, नरेंद्र चौधरी, विनोद महाजन, प्रशांत पाटील, किरण मोरे आदींच्या पथकाने केली.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !