शिरपूरात मूक मोर्चानंतर हिंसक वळण : समाजकंटकाच्या हल्ल्यात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे जखमी


शिरपूर (18 ऑगस्ट 2025) : अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी शिरपूरात आदिवासी समाजातर्फे शांततेत मूक मोर्चा काढण्यात आला मात्र मोर्चानंतरच्या अर्ध्या तासानंतर शिरपूरातील गुजराती चौकात अज्ञाम समाजकंटकांनी शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना घेराव घातला व गर्दीतून अज्ञाताने त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना घडली. या घटनेने तातडीने निरीक्षकांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

मोर्चानंतर समाजकंटकांनी केला हल्ला
शिरपूर शहरात सोमवारी अल्पवयीन पीडीतेला न्याय मिळण्यासाठी आदिवासी समाजाने मूक मोर्चा काढला मात्र मोर्चानंतर गुजराती चौकात जमलेल्या समाजकंटकांनी जागेवर आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी केली व त्याचवेळी जमावाची समजूत काढत असताना शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर धारधार शस्त्राने पाठीवर वार करीत पळ काढला.




दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिरपूर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !