भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात 20 रोजी लॅपटॉपसह मोबाईलचा लिलाव


Auction of laptops and mobile phones at Bhusawal Lohmarg Police Station on the 20th भुसावळ (18 ऑगस्ट 2025) : भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी विविध गुन्ह्यात तसेच बेवारसरित्या जप्त केलेल्या मोबाईल, लॅपटॉपसह चार्जर आदी वस्तूंचा जाहीर लिलाव बुधवार, 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. इच्छूक खरेदीदारांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सुधीर जंजाळकर यांनी केले आहे.

या वस्तूंचा लिलाव
141 मोबाईल, दोन मोबाईल चार्जर, तीन लॅपटॉप, दोन लॅपटॉप चार्जर, दोन कॅमेरा, चार स्टील ताट, चार स्टील ग्लास, तीन अ‍ॅल्यूमिनिअम पातेले, एक निळा प्लॅस्टीक ड्रम, एक गॅस शेगडी, एक मिक्सर, एक कुलर, तीन बॅग कपड्यांसह, एक सुटकेस आदी वस्तूंचा लिलाव होणार आहे. या वस्तूंच्या लिलावासंदर्भात रेल्वे न्यायालयाने आदेश दिले असल्याचे लोहमार्ग पोलिस सूत्रांनी कळवले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !